मध्य रेल्वेवर काल झालेल्या अपघातानंतर दुरुस्तीचं काम पूर्ण, वाहतूक पूर्ववत सुरु

Repair work was completed after yesterday’s accident on Central Railway, traffic resumed

मध्य रेल्वेवर काल झालेल्या अपघातानंतर दुरुस्तीचं काम पूर्ण, वाहतूक पूर्ववत सुरुIndian Railways. हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News, Hadapsar News.

मुंबई : मध्य रेल्वेवर काल झालेल्या अपघातानंतर दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून, वाहतूक पूर्ववत सुरु झाल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेने काल दादर-पुदुचेरी एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरल्याच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचा प्रवास कमी अंतरावर संपवला होता.
साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस आणि गडाग मुंबई एक्सप्रेस या दोन गाड्या मुंबईहून रद्द केल्या असून त्या अनुक्रमे पुणे-पंढरपूर विशेष पॅसेंजर आणि पुणे-गडाग विशेष गाडी म्हणून चालवल्या जाणार आहेत.
तर, नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस, पुणे मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस, हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेस, मडगाव मुंबई मांडावी एक्सप्रेस, करमाळी मुंबई तेजस एक्सप्रेस, मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि अमृतसर मुंबई एक्सप्रेस या गाड्यांना आज दादर इथं अखेरचा थांबा देण्यात आला आहे.
मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसच्या वेळेत बदल केला. दादर पुदुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे काल दादर इथं रुळावरुन घसरले. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.
Hadapsar News Bureau,
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *