A crowd of devotees at Tuljapur yesterday on the occasion of Chaitra Pournima
चैत्र पौर्णिमेनिमित्त काल तुळजापूर इथं भाविकांची गर्दी
तुळजापूर: चैत्र पौर्णिमेनिमित्त काल तुळजापूर इथं भाविकांची गर्दी झाली होती. तब्बल दोन वर्षानंतर चैत्री पौर्णिमेला देवीचं दर्शन मिळाल्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
काल देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या निमित्तानं हजारो भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली होती. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी येरमाळा इथल्या येडेश्वरी देवी मंदिरातही काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आज येरमाळा इथं येडेश्वरी देवीची पालखी मंदिरातून गावापर्यंत नेली जाणार असून या चैत्र पौर्णिमा उत्सवातील सर्वात महत्त्वाचा असणारा चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो भाविकांनी येरमाळ्यात हजेरी लावली आहे.
Hadapsar News Bureau.