Nagpur to host ‘Magnetic Maharashtra’ – Subhash Desai
नागपुरात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ घेणार – सुभाष देसाई
नागपुर : विदर्भात गुंतवणूक वाढावी यादृष्टीनं नागपुरात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ घेणार अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ५८ व्या स्थापना दिनी ते काल बोलत होते.
विदर्भात मिहानच्या माध्यमातून आणि इतर एमआयडीसीमध्ये अधिकाधिक प्रकल्प उभे रहावेत यासाठी विदर्भाच्या औद्योगिक विकासावर राज्यसरकरच लक्ष आहे. नव्यानं गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
त्याचाच भाग म्हणून नवीन उद्योगांना आकर्षित करणारा मॅग्नेटिक महाराष्ट्र हा गुंतवणुकीचा महोत्सव नागपुरात घेण्याचा शासन विचार करत असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.
‘मिहान’ मधल्या प्रकल्पांना सवलतीच्या दरात वीज देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शासनानं महिला उद्योजकांसाठी अनेक योजना आणल्या असून त्याचा लाभ घ्यावा.
युवकांनीही उद्योग स्थापनेसाठी पुढे यावं, असं आवाहन देसाई यांनी केलं.
Hadapsar News Bureau.