लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध – प्रधानमंत्री

The government is always committed to the empowerment of small farmers, women – Prime Minister

लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध – प्रधानमंत्री

बनासकांठा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या दियोदार इथं अनेक विकास कामांचं लोकसमर्पण तसंच भूमिपूजन झालं.Narendra Modi   हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

प्रधानमंत्र्यांनी बनास डेअरी संकुल, बटाटा प्रक्रिया संयंत्र,जैविक खत आणि बायोगॅस संयंत्र यांचं उदघाटन केलं, तर ४ गोबर गॅस प्रकल्पांची पायाभरणी केली.

व्होकल फॉर लोकलचं उत्तम उदाहरण असलेले हे प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी सक्षम करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रकल्प पारंपरिक साधन सामुग्रीतून आधुनिक उत्पादनं तयार करताना रोजगाराच्या संधीही निर्माण करतील, असंही ते म्हणाले.

नवीन डेअरी संकुल हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे.  हे सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल, सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन खवा आणि 6 टन चॉकलेट इथे दररोज तयार करता येतील.

बटाटा प्रक्रिया केंद्र फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीज इत्यादी प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचे विविध प्रकार तयार करेल, यापैकी बरेच इतर देशांमध्ये निर्यात केले जातील. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करतील आणि या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतील.

“बनासकांठामधील लोकांचे कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेबद्दल मी त्यांचे कौतुक करू इच्छितो.  या जिल्ह्याने ज्या पद्धतीने कृषी क्षेत्रात ठसा उमटवला आहे ते कौतुकास्पद आहे.  शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले, जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचे परिणाम सर्वांनाच पाहायला मिळत आहेत.” असे ते म्हणाले.

माता अंबाजीच्या पवित्र भूमीला नमन करून पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी बनासच्या महिलांचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांच्या अदम्य भावनेबद्दल आदर व्यक्त केला.

गावाची अर्थव्यवस्था आणि भारतातील माता-भगिनींचे सक्षमीकरण कशाप्रकारे बळकट होऊ शकते आणि सहकार चळवळ स्वावलंबी भारत मोहिमेला कसे बळ देऊ शकते हे येथे प्रत्यक्ष अनुभवता येते असे पंतप्रधान म्हणाले.  काशीचे खासदार या नात्याने वाराणसीमध्येही संकुल उभारल्याबद्दल बनास डेअरी आणि बनासकांठामधील लोकांचे पंतप्रधानांनी आभार मानले.

गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि महिलांना सक्षम करण्यात बनास डेअरी हे एक महत्वाचं केंद्र ठरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तिथे मध उत्पादन उद्योगही विकसित होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं.

छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार नेहमीच कार्यरत आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी यावेळी बनास कम्युनिटी रेडिओ केंद्राचंही उदघाटन केलं. शेतकऱ्यांना पशुपालन आणि शेतीविषयी वैज्ञानिक माहिती मिळावी या उद्देशानं हे केंद्र सुरु करण्यात आलं आहे.

हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *