चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणार

India’s economy will grow at the fastest pace in the current financial year

चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणार

चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज जागतिक नाणेनिधीनं व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ८ पूर्णांक २ टक्के असेल असं नाणेनिधीनं म्हटलं आहे.

जगातल्या इतर देशांच्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. यापूर्वी हा दर ९ टक्के राहण्याचा अंदाज नाणेनिधीनं व्यक्त केला होता. मात्र युक्रेन-रशिया युद्धामुळं वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळं यात घट करण्यात आली आहे.

महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी जगभरातल्या रिझर्व्ह बँकांना पतधोरणातल्या विविध आयुधांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ८ टक्के तर रिझर्व्ह बँकेनं ७ पूर्णांक २ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे.

जगाचा गेल्या आर्थिक वर्षाचा विकास दराचा अंदाजही ४ पूर्णांक ४ टक्क्यांवरुन घटवून ३ पूर्णांक ६ टक्के करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात जगाचा आर्थिक विकास दर ३ पूर्णांक ६ टक्के राहील, अशी शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे.

हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *