पुणे वन विभागाकडून वन वणवा परिषदेचे आयोजन

पुणे वन विभागाकडून वन वणवा परिषदेचे आयोजन

पुणे : जिल्ह्यातील वाढत्या वन वनव्याच्या पार्श्वभूमीवर यासंबंधी उपाययोजनाबाबत पुणे वन विभागाच्यावतीने उद्या (२१ एप्रिल) रोजी ११ वा. दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘वन वणवा परिषद- २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पी. राव उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यात वन वनव्याच्या अनेक घटना वन विभागाच्या निदर्शनास येत आहेत. यामध्ये काही मानवनिर्मित तर काही नैसर्गिक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे वन वणवा परिषदेमध्ये वन वणव्याच्या घटना रोखण्याच्या संदर्भात जन जागृती, वन वणवा घटनांना आळा घालण्यासाठी लोक सहभाग वाढविणे तसेच वणवा प्रतिबंधासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

या परिषदेस श्री. राव यांच्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन संरक्षक जयोती बॅनर्जी, पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक राहुल पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन परिषदेचा झूम मिटींग आयडी 85269148520 तर पासवर्ड 946456 असा असून पत्रकार, सरपंच, ग्राम सेवक, ग्राम व्यवस्थापन समितीचे सदस्य, वन व्यवस्थापन समिती सदस्य, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, शहरातील टेकडी ग्रुप, पर्यावरण प्रेमी नागरिक तसेच वन विभागातील वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो ( Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *