उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाच्या कामगारांना दिलेली मुदत संपणार

The term given by the High Court to the workers of ST Corporation will expire

उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाच्या कामगारांना दिलेली मुदत संपणार

मुंबई : सहा महिन्यापूर्वी विस्कळीत झालेली एसटीची सेवा आता पूर्वपदावर येतेय. एसटीच्या ताफ्यातल्या 14 हजार बस गाड्यांपैकी कालपर्यंत 9 हजार 786 बस रस्त्यावर धावत हाेत्या. या बसState-Transport MSRTC Hadapsar Latest News Hadapsar News, हडपसर मराठी बातम्या गाड्यांच्या 30 हजाराहून अधिक फेऱ्या कालपर्यंत झाल्या.
एसटीच्या 90 हजार कर्मचाऱ्यांपैकी 74 हजार कर्मचारी कालपर्यंत कामावर रुजू झाल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी  दिली.

उद्या 22 एप्रिलपर्यंत आंदाेलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर रूजू हाेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. त्यानुसार गेल्या साेमवार पासून माेठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर रूजू हाेत आहेत. यात चालक आणि वाहकांचा माेठा समावेश आहे.

संपामुळे राज्यातील प्रवाशांचे विशेषता विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. एसटी पूर्वपदावर येवू लागल्याने राज्यातील जनतेला माेठा दिलासा मिळालाय.
बस गाड्या जवळजवळ सहा महिने बंद राहिल्याने त्यांच्या दुरूस्तीची कामे माेठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत.
हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *