राज्यात वीजचोरी, थकबाकी असलेल्या भागात पुन्हा भारनियमनाला सुरुवात

Load shading resumes in areas of power theft and arrears in the state

राज्यात वीजचोरी, थकबाकी असलेल्या भागात पुन्हा भारनियमनाला सुरुवात

Electricity Image हडपसर मराठी बातम्या Hadapsar News, Hadapsar Latest News.
Image by Pixabay.com

मुंबई: राज्यात कालपासून पुन्हा भार नियमन सुरू झालं आहे. प्रामुख्यानं वीजचोरी, थकबाकी असलेल्या ठिकाणी भार नियमन केलं जात असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात सध्या चौदाशे ते पंधराशे मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. त्यामुळं सर्वच जिल्ह्यांच्या काही भागात भारनियमन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या वीजेच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. त्यानंतर राऊतांनी ही माहिती दिली. अदानी वीज कंपनीनं राज्याला होणारा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळं भार नियमन करावं लागतं आहे. या कंपनीवर केंद्रीय वीज कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गुजरातमधून खरेदी करण्यात येत असलेली वीज महाराष्ट्राला पुरवण्यातले तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अतिरीक्त वीज उपलब्ध असलेल्या राज्यांकडून वीज खरेदी करण्याची महाराष्ट्राची तयारी असल्याचंही ते म्हणाले.

हडपसर न्युज ब्युरो ( Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *