सीबीआयने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरुद्ध आरोपपत्र केले दाखल

CBI files charge sheet against Chitra Ramakrishna, former CEO of the National Stock Exchange

सीबीआयने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरुद्ध आरोपपत्र केले दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने काल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक, चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे माजी समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमण्यन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं.
सीबीआयने सुब्रमण्यम आणि चित्रा यांना अनुक्रमे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या प्रकरणी अटक केली होती. सेबीच्या अहवालानंतर ही कारवाई केली गेली,
ज्यामध्ये सुब्रमण्यम यांची बेकायदेशीर नियुक्ती केल्याप्रकरणी आणि “हिमालय योगी” सोबत शेअर बाजारासंबंधित गोपनीय माहिती सामायिक केल्याबद्दल चित्रा रामकृष्ण यांना दोषी ठरवले आहे. सीबीआयचा आरोप आहे की, चित्रा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला.
11 फेब्रुवारी 2022 रोजी, चित्रा रामकृष्ण यांना सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
CBI द्वारे 2018 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता, परंतु रामकृष्ण आणि सुब्रमण्यन यांच्या विरुद्ध कारवाई SEBI च्या अहवालानंतर करण्यात आली ज्यामध्ये रामकृष्ण यांना सुब्रमण्यन यांची बेकायदेशीर नियुक्ती केल्याबद्दल आणि “रहस्यमय हिमालयन योगी” सोबत बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती सामायिक केल्याबद्दल आरोप लावला.
हडपसर न्युज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *