पोलिसांनी गुन्हेगारांपेक्षा दोन पावलं पुढे राहण्याची तसंच पोलिस कॉन्स्टेबल्सनी तंत्रस्नेही राहण्याची गरज

Police need to be two steps ahead of criminals and police constables need to be tech-friendly – Amit Shah

पोलिसांनी गुन्हेगारांपेक्षा दोन पावलं पुढे राहण्याची तसंच पोलिस कॉन्स्टेबल्सनी तंत्रस्नेही राहण्याची गरज – अमित शहा

पोलिसांनी गुन्हेगारांच्या दोन पावलं पुढे राहणं आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञान महत्वाचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज भोपाळमध्ये  केंद्रीय  पोलीस प्रशिक्षण अकादमीत आयोजित  ४८ व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसला संबोधित करताना बोलत होते.

“देशातील पोलीस व्यवस्थेत ‘अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या’ योगदानाचे महत्त्व दुहेरी आहे. एक म्हणजे, एकसारख्या आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने देशभरातील पोलिसांमध्ये समन्वय आणि दुसरे म्हणजे गुन्हेगारांच्या तुलनेत सरस ठरण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर”, असे शहा यांनी यावेळी  सांगितले.Police need to be two steps ahead of criminals and police constables need to be tech-friendly - Amit Shah हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News Hadapsar  Latest News

“आपल्या संविधानात पोलीस हा राज्यसूचीतील विषय आहे. आणि संविधान अंमलात आल्यापासून आजपर्यंत पोलिसांसमोर अनेक आव्हाने उभी राहण्याचे कारण गुन्हेगारी जगताला आलेली नवनवी परिमाणे हे आहे.शिवाय असे  पैलू समोर आले आहेत, ज्यांच्यामुळे देशातील पोलिसांना एकमेकांशी सुसंवाद साधून काम करावे लागेल. अन्यथा या आव्हानांशी दोन हात करणे शक्यच होणार नाही.” असेही ते म्हणाले.

“यासाठी संविधानात बदल करण्याची काही गरज नाही तर, ‘अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदे’सारख्या बैठकांमधून आणि महासंचालक परिषदांमधून काही राज्ये आपल्या क्षेत्रातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी एकत्र येऊन एकसमान धोरण ठरवून घेऊ शकतात”, असे मत गृहमंत्र्यांनी  व्यक्त केले.

अंमली पदार्थ, हवाला व्यवहार आणि सायबर घोटाळे हे देशभरातील पोलिसांसमोरचे सामायिक प्रश्न आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस विज्ञान परिषद हा सामायिक रणनीती ठरवण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी एक आदर्श मंच ठरेल, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.

पोलीस संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत घेतलेल्या अशा बैठकांमुळे देशभरातील पोलिसांना, या अडचणी व त्यांच्या विरोधात कृती करताना जाणवणाऱ्या त्रुटी यांविषयी चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळते, असेही त्यांनी सांगितले. अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी देशभरच्या पोलिसांना रणनीती आखता यावी असा उद्देश मनात धरून संस्थेने त्यांचे कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना गृहमंत्र्यांनी केली.

पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलनं  देखील तंत्र-स्नेही असायला हवं असं ते म्हणाले. पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी, पोलीस तंत्रज्ञान अभियान, न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि बोटांच्या ठशावर आधारित NAFEES (नाफीस) प्रणालीसारखे कार्यक्रम  सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे देशाच्या प्रत्येक राज्यात तळागाळापर्यंत माहितीचा ओघ सुरु होईल तसंच विदा सहज उपलब्ध व्हायला मदत होईल, असं ते म्हणाले. भोपाळमध्ये न्याय वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ सुरु करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *