According to the Finance Minister, India’s economic growth in the current financial year is expected to be 8-point 9 per cent
चालू आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वाढ ८ पूर्णांक ९ दशांश टक्के राहण्याचा अर्थमंत्र्यांचा अंदाज
वॉशिंग्टन डीसी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वाढ ८ पूर्णांक ९ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगातल्या सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांच्या
तुलनेत ही वाढ सर्वाधिक राहील.
देशाची लवचिकता आणि भक्कम पुनरागमन यातून दिसून येते असं त्या म्हणाल्या. वॉशिंग्टन डीसी इथं आयोजित जागतिक बँकेच्या विकास समितीच्या बैठकीत सहभागी होताना त्या बोलत होत्या. भारतानं स्वेच्छेनं सर्व देशांना कोविड लस इंटेलिजेंस नेटवर्क प्लॅटफॉर्म म्हणजे CoWIN उपलब्ध करुन दिलं असल्याचं त्या म्हणाल्या.
श्रीलंकेतील अभूतपूर्व परिस्थितीकडे लक्ष वेधताना सीतारामन यांनी श्रीलंकेला निर्णायक दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली.
हडपसर न्युज ब्युरो