प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्या मुंबईत पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जाणार

Prime Minister Narendra Modi will receive the first Lata Dinanath Mangeshkar Award in Mumbai tomorrow

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्या मुंबईत पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जाणार

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांना पहिल्या  लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं

Prime Minister Narendra Modi
File Photo

गौरवण्यात येणार आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशासाठी आणि जनतेसाठी  पथदर्शक आणि  नेत्रदीपक असं महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला यावर्षीपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जागतिक नेते असून त्यांनी भारताला जागतिक नेतृत्वाच्या वाटेवर नेलं आहे, त्यामुळे या पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचं मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठाननं  म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी हे देशाचे प्रेरणास्थान असून देशाच्या गौरवशाली इतिहासातल्या महान नेत्यांपैकी ते एक आहेत, असं प्रतिष्ठाननं म्हटलं आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *