Police arrest MP Navneet Rana and her husband MLA Ravi Rana in Hanuman Chalisa recitation case
हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पोलिसांकडून अटक
मुंबई : शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्रक्षी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसाचं पठण करायचा इशारा दिल्याबद्दल अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही अटक केल्याचं गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी वार्ताहरांना सांगितलं.
शिवसैनिकांनी आज नवनीत राणा यांच्या घराबाहेर निदर्शने केली तसंच बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर राणा यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे, तसंच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास स्थानाभोवतालची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा विडा शिवसेनेन घेतला असून यामुळे शिवसेनेला सहानुभूती मिळेल, अस वाटत असावं असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारकडून चुकीच्या पद्धतीनं या प्रकरणाची हाताळणी केली जात असून, पोलिसांच्या मदतीनेच हे सगळ केलं जातंय असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान प्रधानमंत्र्यांच्या उद्या होणार असलेल्या मुंबई दौऱ्यामुळे आपण हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम रद्द केल्याचं राणा यांनी म्हटलं आहे, तर प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्या कार्यक्रमाला संरक्षण देईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.
हडपसर न्युज ब्युरो