Money laundering and terror funding case: Nawab Malik’s judicial custody extended till May 6
मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ मेपर्यंत वाढ
मुंबई : मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयानं मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ मेपर्यंत वाढ केली आहे.
या प्रकरणी ईडीनं गुरुवारी मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. ईडीचा खटला ९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये नोंदवलेल्या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं २३ फेब्रुवारी रोजी मालिक यांना अटक केली होती.
हडपसर न्युज ब्युरो