प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जम्मू-काश्मिरमधल्या २० हजार कोटींच्या विविध प्रकल्पाचं उद्घाटन

Prime Minister inaugurates various projects worth Rs 20,000 crore in Jammu and Kashmir

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जम्मू-काश्मिरमधल्या २० हजार कोटींच्या विविध प्रकल्पाचं उद्घाटन

जम्मू-काश्मीर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मिरमध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. आज त्यांनी अमृत सरोवर मोहिमेचीPM-Narendra Modi हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar  News घोषणा केली.

याअंतर्गत देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ७५ सरोवर निर्माण केले जाणार आहेत.राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त संभा जिल्ह्यात पल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले.

या सोहळ्यात त्यांनी देशभरातल्या सर्व ग्रामसभांना संबोधित केलं.जम्मू-काश्मीरसारख्या छोट्या राज्यात २० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ही मोठी गोष्ट असून, यामुळे या भागचा विकास होत असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं.
या प्रकल्पांमुळे इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असंही ते म्हणाले.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेची पायाभरणी केली आणि सांबा येथील 108 जन औषधी केंद्रांसह पल्ली गावात 500KW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
3100 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेल्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याचेही त्यांनी उद्घाटन केले. 8.45 किमी लांबीचा बोगदा बनिहाल आणि काझीगुंड दरम्यानचे अंतर 16 किमीने कमी करेल आणि प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासाने कमी करेल.
पंतप्रधानांनी किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या ८५० मेगावॅट रॅटले जलविद्युत प्रकल्प आणि ५४० मेगावॅट क्वार जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही केली.
जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले, पल्ली भारताची पहिली कार्बन-न्युट्रल पंचायत बनण्याच्या मार्गावर आहे. ते म्हणाले, ‘सबका प्रार्थना’ काय करू शकते हे पल्लीच्या लोकांनी दाखवून दिले आहे.
आज १०० जन औषधी केंद्र त्याचप्रमाणे स्वामित्व कार्डाचे वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामित्व कार्डामुळे खेड्या-पाड्यात नव्या शक्यता निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हडपसर न्युज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *