देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली शरद पवार

Sharad Pawar asserted that the responsibility of keeping the country united has fallen on all of us

देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली शरद पवार

Nationalist Congress Party President Sharad Pawar हडपसर मराठी बातम्या , Hadapsar News, Hadapsar Latest News
File Photo

कोल्हापुर : देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते काल कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प सभेत बोलत होते.

सत्ता हातात आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसात एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचं दुःख कमी कसं होईल, समाजातील सगळे घटक एका विचारानं कसे राहतील, हे पाहण्याची जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाच्या आणि सरकारच्या प्रमुखांची असते, पण आज चित्र वेगळं दिसतय. माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण झालं आहे. असं पवार म्हणाले.

सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, इत्यादी मंत्री, तसंच पक्षाचे आमदार ,खासदार, आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण प्रश्नी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काही उलटसुलट निर्णय झाला, तर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्याच्या तयारीला लागा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *