This week’s restrictions will remain in place until next week.

Citizens should act responsibly considering the possible third wave of corona: – Home Minister Dilip Walse Patil.

Given the current number of corona patients in rural and urban areas of the district, this week’s restrictions will remain in place next week. Also, considering the danger of a possible third wave, citizens should act more responsibly, stated Home Minister Dilip Walse Patil. A review meeting on Corona situation and measures in the district was held under the chairmanship of Home Minister Dilip Walse-Patil at the Council Hall of the Pune Divisional Commissioner’s Office. 

Mr Walse Patil said that there is a need to increase the rate of vaccination in rural and urban areas of the district. Also, vaccination of PESA citizens should be completed as soon as possible through planning. Corona testing has been increased for super spreaders, shopkeepers, traders in the market. Also, Rapid Antigen Test (RAT) has been made mandatory every fortnight. Vaccination of disabled citizens has started. The administration is preparing for a possible third wave. Citizens also need to know their responsibilities and take care of them. 

This week’s restrictions will remain in place until next week.   

Dilip-Walse-Patil Home Minister
Home Minister Dilip Walse Patil

 

Schools, colleges closed till 15th July.

 

Instructions to increase vaccination in the PESA area.

 

Hotel managers should follow the rules in view of the crowd at the wedding ceremony.

 

The administration should conduct a rigorous audit of the bill.

 

Home Minister Dilip Walse Patil

The administration needs to take maximum care of mucormycosis patients. Considering the danger of Delta Plus, the administration and the citizens need to take appropriate precautions. Citizens should leave their homes only if they need to. Avoid tourism and public places. Considering the crowd of citizens at the wedding ceremony, the hotel management and mangal offices should implement the rules of administration. The police administration should take punitive action against those who do not enforce the rules. Considering the danger of the third wave, schools and colleges in the district will remain closed till July 15. The hospital currently receives complaints about corona patient bills and drug bills. Therefore, Mr Valse Patil also instructed the administration to conduct a rigorous audit.

Dr Subhash Salunkhe said that considering the danger of the third wave, those who are super-spreaders need to be vaccinated as much as possible. Vaccinating as many citizens as possible, acting responsibly will reduce the intensity of the third wave.

Divisional Commissioner Saurabh Rao informed about the corona outbreak and measures in the district as well as the preparations made for the third wave of vaccination.

Pune Municipal Commissioner Vikram Kumar and Pimpri Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil informed about the measures being taken by the Municipal Corporation. Also, Collector Dr Rajesh Deshmukh informed about the corona disease and vaccination in the district.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागावे :- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांची सद्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवडयात कायम राहतील. तसेच संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

श्री. वळसे पाटील म्हणाले, जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करुन पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ( RAT) बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. संभाव्य तिस-या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे श्री. वळसे पाटील म्हणाले.

या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवडयात कायम राहतील.   

Dilip-Walse-Patil Home Minister
Home Minister Dilip Walse Patil

 

शाळा, महाविद्यालये 15 जूलैपर्यंत बंद.

पेसा भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश. 

\
विवाह समारंभात होणारी गर्दी पाहता हॉटेल व्यवस्थापकांनी नियमांचे पालन करावे.

बिलाच्या तक्रारी पाहता प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करावे.

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील .

प्रशासनाने म्यूकरमायकोसीस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी ‍जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलै पर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सद्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल या विषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करण्याच्या सुचनाही श्री.वळसे पाटील यांनी दिल्या.
डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडर ठरणा-यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे, जबाबदारीने वागणे यामुळे तिस-या लाटेची तीव्रता कमी करता येईल.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हयातील कोरोना प्रादुर्भाव व उपाययोजना तसेच तिस-या लाटेच्या दृष्टीने केलेली तयारी लसीकरण याबाबतची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हयातील कोरोना रुग्णस्थिती व लसीकरणाबाबत माहिती दिली.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *