मार्च 2024 पर्यंत जनौषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

The government has set a target to increase the number of Jan Aushadhi Kendras to 10,000 by March 2024

मार्च 2024 पर्यंत जनौषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

नवी दिल्ली : प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना (PMBJP) याची अंमलबजावणी करणाऱ्या फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाईसेस ब्युरो ऑफ इंडिया, या संस्थेने  भारतात पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्रे (PMBJKs), सुरू करण्यासाठी ,बेरोजगार व्यक्ती  औषध जाणकार   (फार्मासिस्ट), सरकारने नामनिर्देशित केलेल्या एजन्सीज, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था इत्यादींकडून अर्ज मागविले आहेत.

हे अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मागवले आहेत.इच्छुक अर्जदार पीएमबीआयच्या  janaushadhi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.  पात्र अर्जदारांना प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर पीएमबीजेपी (PMBJP) च्या अंतर्गत औषध परवाना घेण्यासाठी तत्वतः मान्यता दिली जाईल.

सामान्य जनतेला, विशेषत: गरिबांसाठी स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून सरकार मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची (PMBJKs) संख्या 10000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

31.03.2022 पर्यंत या केंद्रांची  संख्या 8610 पर्यंत वाढली आहे.आतापर्यंत पीएमबीजेपीअंतर्गत, देशातील सर्व 739 जिल्हे समाविष्ट झाले आहेत.यासह 406 जिल्ह्यांतील 3579 तालुके समाविष्ट करण्यासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत.

लहान शहरे आणि तालुका मुख्यालयातील रहिवासी आता प्रधानमंत्री जनौषधी केंद्रे सुरू करण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत महिला, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, डोंगराळ भागातील जिल्हे, बेटांवरील जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांसह विविध श्रेणींसाठी व्यक्तिंना याअंतर्गत प्रोत्साहन/ विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे.

पीएमबीजेपीअंतर्गत येणाऱ्या विक्री उत्पादनांत 1616 औषधे आणि 250 शस्त्रक्रिया उपकरणे आहेत; जी सध्या देशभरात कार्यरत असलेल्या 8600 हून अधिक प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांवर (PMBJKs) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *