In future, the state government will set up cathlabs in 19 districts – Rajesh Tope
आगामी काळात राज्य सरकार १९ जिल्ह्यांमधे कॅथलॅब्स स्थापन करणार -राजेश टोपे
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतल्या बचतीच्या रकमेतून, आगामी काळात राज्य सरकार १९ जिल्ह्यांमधे कॅथलॅब्स स्थापन करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत
मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली.
राज्य सरकारकडे गेल्यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत २५० कोटी रुपयांची बचत झाली आहे. ज्या १९ जिल्ह्यांमधे आरोग्य महाविद्यालयं नाहीत, त्या जिल्ह्यांमधे कॅथलॅब्स उभारणीसाठी ही रक्कम दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
कॅथलॅब्समुळे हदयावरची शस्त्रक्रिया, अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी रुग्णांवर करता येतील. तसंच उर्वरित रकमेतून ठाणे, जालना, पुणे आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमधे कर्करागावर रेडिएशन केंद्र स्थापन करायला राज्यमंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
कोविड रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे लोकांनी स्वेच्छेनं मास्क घालावा, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं. मास्क न घालणाऱ्यांवर सध्या तरी दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, मात्र रुग्णसंख्येवर सरकारचं लक्ष असेल, असं टोपे यावेळी म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो