मुंबईतल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेचं प्रवासी भाडं ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर

Ample provision in the Centre’s budget to provide state-of-the-art and safe railway service to Mumbaikars – Raosaheb Danve

मुंबईतल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेचं प्रवासी भाडं ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर

मुंबई : मुंबईकरांना अत्याधुनिक आणि सुरक्षित रेल्वे सेवा मिळावी याकरता केंद्राने अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे, असं रेल्वे राज्यमंत्रीरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News. रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

मुंबईतल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेचं प्रवास भाडं ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जाहीर केला.

या कपातीनंतर वातानुकूलित  उपनगरी गाडीतून २५ किलोमीटर प्रवासासाठी  ६० रुपये तर ५० किलोमीटर प्रवासासाठी १०० रुपये होईल द्यावे लागतील. यापूर्वी हे प्रवास भाडं अनुक्रमे १३५ आणि २०५ इतकं होतं.

मुंबईकरांना अत्याधुनिक आणि सुरक्षित रेल्वे सेवा मिळावी याकरता केंद्राने पूर्वीच्या तुलनेत अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे, असं दानवे यांनी सांगितलं. मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जागतिक वारसा स्थळ असून त्याच्या ऐतिहासिक वैभवाला इजा न करता त्याठिकाणी  विमानतळाच्या तोडीच्या सुविधा देण्याचा सरकारचा  प्रयत्न  आहे, असं ते म्हणाले.

मुंबईच्या भायखळा स्थानकातल्या नवीन सुशोभित बांधकामांचं आणि सुविधांचं लोकार्पण केल्यानंतर आज ते बोलत होते. आपल्या सरकारने पूर्वीच्या गोष्टी चांगल्या सांभाळल्या असून मुंबईतली रेल्वे स्थानकं विमानतळाच्या तोडीची व्हावी याकरता आपण प्रयत्न करु असं ते म्हणाले.

विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *