The newly inaugurated Prime Minister’s Museum is a center of attraction for the youth – Prime Minister
नुकतंच लोकार्पण झालेलं प्रधानमंत्री संग्रहालय युवकांच्या आकर्षणाचं केंद्र – प्रधानमंत्री
नवी दिल्ली : नुकतंच लोकार्पण झालेलं प्रधानमंत्री संग्रहालय युवकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत आहे या बद्दल आपल्याला आनंद होत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या 24 तारखेला
आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटलं होतं.
मन की बातचा हा 88 वा भाग होता. लोकांनी व्होकल फॉर लोकलचा भाग म्हणून सुट्टीत स्थानिक संग्रहालयांना भेट द्यावी आणि म्यझिअम मेमरिज या संकेत स्थळावर आपले अनुभव शेअर करावेत, असं आवाहनही त्यांनी केलं होत.
डिजिटल द्येयकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी जास्तीत जास्त रोकड विरहीत व्यवहारांना प्राधान्य द्यावं, असंही ते म्हणाले होते. सध्या केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे दिव्यांगजन खेळांव्यतिरिक्त कला, शिक्षण आणि अन्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जल संवर्धनासाठी देशात विविध अभियान राबवलं जात आहे.
देशातल्या ग्रामीण भागातही या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं. गणिताच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक दिग्गजांनी आपलं योगदान दिलं आहे.वेदीक गणितात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांशी आणि तज्ञांशी बोलताना फार आनंद झाला.
लोकांनी वेदीक गणिताकडे आपला कल वाढवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आणि आपली क्षमता तपासण्यासाठी जनतेनं मन की बात मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही ते म्हणाले होते.