जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

Lieutenant General Manoj Pande takes over as new Chief of Army Staff

जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

नवी दिल्ली : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या पदावर नियुक्तीजनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभारLieutenant General Manoj Pande takes over as new Chief of Army Staff हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News होणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर १९८२ साली जनरल पांडे यांची अभियांत्रिकी कोअरमध्ये नियुक्ती झाली. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पालनवाल सेक्टरमध्ये लष्करानं केलेल्या  ‘ऑपरेशन पराक्रम’  या कारवाईत जनरल पांडे यांनी अभियांत्रिकी रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं.
आपल्या ३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत जनरल पांडे यांनी पश्चिम अभियांत्रिकी ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ, लडाखमधे माउंटन डिव्हिजन आणि ईशान्य कोअरचं नेतृत्व केलं.

दरम्यान आज सकाळी मावळते लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना आज सकाळी नवी दिल्ली इथं लष्करानं  गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित केलं.

 त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली.

लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे यांनी दिलेल्या योगदानामुळे देशाचं लष्करी सामर्थ्य आणि सामरिक तयारी मजबूत झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *