The demise of Prema Kiran is a great loss to the Marathi film industry – Cultural Affairs Minister Amit Deshmukh
प्रेमा किरण यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी प्रेमा किरण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मंत्री श्री. देशमुख यांनी म्हटले आहे की, १९९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमध्ये प्रेमा किरण यांनी नायिकेच्या भूमिका केल्या आणि त्या भूमिका गाजल्या होत्या.
धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी अशा विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण होईल, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.
मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याच्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. ”धुम धडाका” चित्रपटातील त्यांनी साकारलेली ”अंबाक्का” प्रचंड गाजली होती.
फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण या निर्मात्यादेखील होत्या. १९८९ मध्ये आलेल्या ”उतावळा नवरा” या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
हडपसर न्युज ब्युरो