४ वर्ष कालावधीच्या पदवीसह संयुक्त बीएड अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायला सुरुवात

Start of online application for joint B Ed course with 4 year degree

४ वर्ष कालावधीच्या पदवीसह संयुक्त बीएड अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायला सुरुवात

मुंबई : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने चार वर्षीय एकीकृत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरता ऑनलाइन (https://ncte.gov.in/website/ActandRegulation.aspx) अर्ज मागवले आहेत.

या कार्यक्रमांतर्गत बी ए-बी एड, बी. एस. सी. – बी एड आणि बी कॉम-बी. एड च्या पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.

हा शिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चाच एक भाग असून या अभ्यासक्रमाकरता राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सामान्‍य प्रवेश परीक्षेच्या  माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे.

१२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाकरता प्रवेश घेऊ शकतात.

हा अभ्यासक्रम शिक्षक शिक्षण क्षेत्राचा पुनरुद्धार करणारा अभ्यासक्रम ठरेल, असा विश्वास शिक्षण मंत्रालयानं व्यक्त केला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *