IFCI ची फसवणूक केल्याप्रकरणी मेहुल चोक्सी आणि गीतांजली जेम्स या कंपनीसह ६ जणांविरुद्ध नवी तक्रार दाखल

CBI files fresh case against fugitive Mehul Choksi, Gitanjali Gems, SLC and others

IFCI ची फसवणूक केल्याप्रकरणी मेहुल चोक्सी आणि गीतांजली जेम्स या कंपनीसह ६ जणांविरुद्ध नवी तक्रार दाखल

नवी दिल्ली : IFCI ची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनं मेहुल चोक्सी आणि गीतांजली जेम्स या कंपनीसह ६ जणांविरुद्ध नवी तक्रार दाखल केली आहे.Central Bureau of Investigation CBI केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

केंद्रीय अन्वेषण विभागाने आज फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, गीतांजली जेम्स लिमिटेड, सूरजमल लल्लू भाई अँड कंपनी आणि इतरांविरुद्ध इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 25 कोटी रुपयांच्या कर्जाची कथितपणे फसवणूक केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे.

दागिन्यांचे मूल्य ठरवणाऱ्यांसोबत संगनमत करुन त्यांनी दागिन्यांची किंमत वाढवली आणि त्याबदल्यात कर्ज घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

२०१६ मध्ये चोक्सीनं IFCI कडून २५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्यावेळी गहाण ठेवलेल्या दागिन्यांचं मूल्य सुमारे ३५ कोटी असल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र नंतर त्याच पुर्नमूल्यांकन केल्यानंतर यातले हिरे कमी दर्जाचे आणि माणिक खोटे असल्याचं आढळलं. त्यामुळं त्यांच्या मूल्यांकनात ९० टक्क्यांची घट झाली आणि IFCI ला २२ कोटींचा तोटा सहन करावा लागला. याप्रकरणी सीबीआयनं मुंबईत आणि कोलकात्यामध्ये ८ ठिकाणी धाडी टाकून काही कागदपत्र गोळा केली.

कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज थकबाकीच्या प्रकरणात चोक्सी आधीच मुख्य आरोपी आहे, ज्यामध्ये त्याने फसव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिटचा वापर केला होता.

हडपसर न्यूज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *