कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलीस महासंचालकांचा इशारा

Director-General of Police warns to take stern action against those who take the law into their own hands

कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलीस महासंचालकांचा इशारा

मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कुणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालकDirector General of Police Rajneesh Seth राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News रजनीश सेठ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बुधवारी राज्यात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. गृहमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली.

महाराष्ट्र पोलीस दल कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास सक्षम असून आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. सामाजिक शांतता आणि सद्भावना सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक पातळीवर शांतता समित्या आणि मोहल्ला समित्यांसह अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. मी राज्यातील प्रत्येक नागरिकाला शांतता राखण्याची आणि पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करतो, ”डीजीपी सेठ म्हणाले.
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.
पोलीस महासंचालकांनी सांगितलं की, औरंगाबाद इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची पडताळणी पोलिसांनी केली आहे. त्याचा अहवाल तयार केला असल्याचंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं आहे.

सामाजिक एकोपा रहावा यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात ठिकठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाच्या ८७ तुकड्या,  ३० हजार होमगार्ड तैनात केले आहेत.

१५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यानंतरही जातीय तेढ निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *