उष्णतेच्या लाटेमुळं होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचना

Prime Minister’s instructions to take all possible measures to prevent deaths due to heatwaves

उष्णतेच्या लाटेमुळं होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचना

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात आलेली उष्णतेची लाट आणि आगामी पावसाळ्यासाठीच्या तयारीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. याबाबत प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आजPrime Minister's instructions to take all possible measures to prevent deaths due to heat waves उष्णतेच्या लाटेमुळं होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचना झालेल्या बैठकीत भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणानं, देशभरात मार्च ते मे दरम्यान वाढलेल्या तापमानाच्या स्थितीची माहिती दिली.

उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू तसंच आगीच्या घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्य़ा  सूचना  प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिल्या. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधल्या अग्नीशामक व्यवस्थाचं नियमित परीक्षण होणं गरजेचं आहे, देशभरातल्या वैविध्यपूर्ण वन परिसंस्थेत अशा वेळी जंगलांची हानी लक्षणीयरित्या कमी होणं, आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या दर्जाबाबत देखरेखीची व्यवस्था चांगली असल्याची खातरजमा करुन घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उष्णतेची लाट आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असाव्यात, यादृष्टीनं केंद्र आणि राज्याच्या यंत्रणामधे प्रभावी समन्वय असावा, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

हडपसर न्यूज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *