युरोपियन युनियन दिवस साजरा करण्यासाठी एक दिवसीय चर्चासत्र

A one-day seminar organized by the International Center for the Celebration of European Union Day on 11 May 2022.

युरोपियन युनियन दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे एक दिवसीय चर्चासत्राचे ११ मे २०२२ रोजी आयोजन.

पुणे : आंतरराष्ट्रीय केंद्राने ११ मे, २०२२ रोजी युरोपियन युनियन दिवस साजरा करण्यासाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत महामहिम उगो अस्तुटो, हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असतील. ते ‘ई- यु – इंडीया: ए ग्रीन, डिजिटल अँड रेसिलेन्ट फ्युचर’ या विषयावर मुख्य भाषण देतील.

दुसऱ्या सत्रात उच्च शिक्षण तज्ञ संजीव रॉय ‘युरोपमधील उच्च शिक्षणाच्या संधी’ या विषयावर बोलतील. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

सुश्री रेनिता भास्कर, मंत्री समुपदेशक, व्यापार आणि आर्थिक व्यवहार प्रमुख, युरोपियन युनियनचे भारतातील शिष्टमंडळ आणि प्रकाश नायक, टीम लीडर EUPOP आणि संजीव रॉय, उच्च शिक्षण तज्ञ EUPOP; माननीय प्रा. एन.जे. पवार, पाटील वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, माननीय प्रा. (डॉ.) एन.एस. उमराणी आणि कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार, हे सन्माननीय अतिथी असतील.

संचालक, आंतरराष्ट्रीय केंद्र, प्रा. (डॉ.) विजय खरे, कार्यक्रमाचे निमंत्रक असतील. हा कार्यक्रम ११ मे २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता मुख्य इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होईल.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *