ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

New web portal for skill development of OBC youth

ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

युवक-युवतींना मिळणार परिपूर्ण माहिती – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवक -युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने नवीन वेबपोर्टल www.msobcfdc.org तयार करण्यातOther Backward Bahujan Welfare Minister Vijay Vadettiwar इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News आले आहे. ओबीसी युवक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माहितीसाठी या  वेबपोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या www.msobcfdc.org या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयासमोरील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, कौशल्य विकास अधिकारी विजय काटोलकर यावेळी उपस्थित होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील परंपरागत व्यवसायात असलेल्या व्यक्तींनाही या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेवून व्यावसायिक स्पर्धेत उतरता येईल. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना महामंडळाच्या थेट कर्ज योजना व व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून व्यवसायदेखील उभा करता येईल.

या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्ष वयोगटातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना घेता येवू शकतो. अधिक माहितीकरिता www.msobcfdc.org या वेबपोर्टलवरील कौशल्य प्रशिक्षण योजना या लिंकला भेट द्यावी.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *