The number of corona patients found in the state and in Mumbai yesterday has more than doubled
राज्यात आणि मुंबईत काल आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या परवापेक्षा दुप्पट
मुंबई : राज्यात आणि मुंबईत काल आढळलेल्या कोविड १९ च्या नव्या रुग्णांची संख्या कालच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. राज्यात काल २२३ नव्या रुग्णांची नोंद झाली, १६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७९ हजार ६२२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७७ लाख ३० हजार ३७० रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४७ हजार ८४९ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ हजार ४०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत काल १२२ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी १२० रुग्णांमधे लक्षणं नाहीत. २ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. आज १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
मुंबईत सध्या ८४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला कोरोना मुक्तीचा दर ९८ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६ हजार ४५३ दिवसांवर आला आहे.
हडपसर न्युज ब्युरो