निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस

Mumbai Police’s lookout notice against suspended Deputy Commissioner of Police Saurabh Tripathi

निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस

मुंबई : अंगडीया खंडणी प्रकरणी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे.

गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्यानं हे पाऊल उचलल्याचं पोलीसांनी सांगितलं.  रोकड आणि मौल्यवान वस्तूंची ने-आण करणाऱ्या अंगडीया व्यावसायिकांकडून दरमहा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची  तक्रार  त्रिपाठीविरुद्ध आहे.

त्रिपाठीविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक टाळण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तो फेटाळण्यात आला.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंगडिया असोसिएशनने मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि आरोप केला होता की त्रिपाठी यांनी काही ऑपरेटर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना इन्कमटॅक्स छापे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून 15-18 लाख रुपये उकळले.

तक्रारीनंतर नागराळे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्रिपाठी यांनी हवाला चॅनलद्वारे उत्तर प्रदेशात खंडणीची रक्कम पाठवल्याचा आरोप आहे. तपासासाठी एकूण पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पोलीस आता त्रिपाठीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंगडिया ऑपरेटरकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी यापूर्वी तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम, पोलिस उपनिरीक्षक समाधान जमदाडे, ओम वनगटे यांच्यासह अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *