सहकार क्षेत्राच्या निकोप विस्तारासाठी चांगल्या दृष्टीकोनाची गरज – शरद पवार

The need for a better approach for the expansion of the co-operative sector – Statement by Sharad Pawar

सहकार क्षेत्राच्या निकोप विस्तारासाठी चांगल्या दृष्टीकोनाची गरज – शरद पवार यांचं प्रतिपादन

नांदेड: सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील अर्थकारण सुधारण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. सहकार क्षेत्राच्या निकोप विस्तारासाठी चांगला दृष्टीकोन ठेवला पाहिजे, असं मत राष्ट्रवादी

Sharad-Pawar हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News.
File Photo

कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.  आता बॅंकांचे क्षेत्र वाढले असून सहकारी बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्थाकडे बघण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टीकोन अधिक चांगला असायला पाहिजे.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची मदत होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी त्याचबरोबर छोटे मोठे कर्ज घेणाऱ्यांनी देखील ते व्याजासह वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर सहकार क्षेत्राला आणखी बळकटी येईल.

ते आज नांदेडच्या गोदावरी अर्बन को ऑपरेटीव्ह पत संस्थेच्या सहकारसुर्य या कार्यालयीन ईमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राज्यात सहकार चळवळीला १०० वर्षे झाली असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक विकास साधता आला आहे. असं सांगतानाच रिझर्व बँकेने नागरी सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असंही ते म्हणाले.

हळद पिकाविषयी राज्य सरकारनं धोरण ठरवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

यावेळी गोदावरी अर्बन पत पेढीचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. तर अध्यक्षा श्रीमती राजश्री पाटील यांनी पतपेढीचा प्रगतीचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी व्हीडिओ काँफर्न्सद्वारे सहभागी झाले होते. इंदोर – हैद्राबाद एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येत असून या हायवेचा लाभ नांदेड जिल्ह्याला होणार आहे. यामूळे शेतमाल निर्यात करण्यात येईल, असं यावेळी गडकरी यांनी सांगितलं. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री संजय बनसोड, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदी उपस्थित होते.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *