The monsoon is expected to enter the Andamans in 24 hours, according to the meteorological department
मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळं पुढच्या ५ दिवसात अंदमान – निकोबार बेटांवर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात ताशी ४०-५० किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. केरळमधल्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी देशाच्या वायव्य भागात तसंच मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून येत्या २ दिवसात त्याची तीव्रता कमी होईल, असंही हवामान विभागानं म्हटलंय.
हडपसर न्युज ब्युरो