पुण्यात गर्दीच्या चौकात लवकरच अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा

A state-of-the-art traffic signal system will soon be operational in the crowded chowk in Pune

पुण्यातील गर्दीच्या चौकात लवकरच अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार

पुणे : पुण्यातील गर्दीच्या चौकात लवकरच अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेत प्रामुख्यानं लाल आणि हिरव्या सिग्नलच्या कालावधीत वाहनांच्या प्रमाणानुसार बदल केले जाणार असून त्यामुळं या रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी  होणार आहे.

पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. गर्दीचे चौक आणि रस्ते या ठिकाणी उच्च क्षमतेच्या कॅमे-यांद्वारे वाहनांची अधिक गर्दी असणाऱ्या रस्त्यांचा शोध घेतला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात शहर आणि परिसरातील १२५ प्रमुख मार्गावर ही यंत्रणा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे .

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *