सिंदखेड राजा विकास आराखडा करताना स्थानिकांचे सहकार्य घ्यावे

Sindkhed Raja Development plan should take the cooperation of locals – Deputy Chief Minister Ajit Pawar

सिंदखेड राजा विकास आराखडा करताना स्थानिकांचे सहकार्य घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

बुलडाणा :  राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला सिंदखेड राजा चा विकास करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र हा विकास करताना स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेऊन विकास आराखडा करावा. येथील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र जी कामे होतील ती उत्कृष्ट दर्जाची व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

Deputy CM Ajit Pawar
File Photo

सिंदखेड राजा येथील पंचायत समिती सभागृहात सिंदखेड राजा विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

श्री. पवार म्हणाले,  सिंदखेड राजा चा विकास करताना निश्चित असा आराखडा तयार करावा आणि त्यानुसारच विकास कामे करावी.  येथील विकास कामे करताना पुरातत्त्व विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार येथील वास्तूंचे संवर्धन व्हावे.  या ठिकाणचा सर्वांगीण विकास झाल्यास येथील चित्र पालटून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील.  पर्यटन स्थळांचा विकास होण्याअगोदरच या स्थळांच्या लगतचे अतिक्रमण काढावे. तसेच जमीन अधिग्रहण तातडीने करावे.

ते पुढे म्हणाले, सिंदखेड राजा येथे पर्यटनाच्या निमित्ताने व्यवसायांना उर्जितावस्था प्राप्त होणार असून लोणार- शेगाव अशी स्थळे ही सिंदखेड राजाला जोडण्यात यावी. पर्यटन स्थळांचा विकास करताना स्थानिकांची मदत घ्यावी.

तसेच ही कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत यावर भर द्यावा.  सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन करताना या वास्तू पुन्हा खराब होणार नाही. या दृष्टीने ही कामे करावी. जिजाऊंचे जन्मस्थळ असल्याने शक्य असेल तेवढा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी मराठी,  हिंदी आणि इंग्रजी भाषेतील माहिती फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

विकास आराखड्याच्या बैठकीमध्ये तेरा ऐतिहासिक वास्तू यांच्यासह वस्तुसंग्रहालय, विश्राम गृह, बंदिस्त नाली, वाहनतळ शहराचा बाह्यवळण रस्ता ही विकासकामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *