कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन

Rajesh Tope urges citizens to take care against growing corona in Mumbai and other areas

मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन

मुंबई/जालना : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते.

रुग्णांचं निदान करण्यासाठी कोविड चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील चाचण्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात काल कोविड-१९ च्या ५३६ नव्या रुग्णांची नोंदCovid cases. हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News

राज्यात काल कोविड-१९ च्या ५३६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, कोरोनामुळे मृत्यूची एकही नोंद नाही.

राज्यात आतापर्यंत ७८ लाख ८४ हजार ८६५ जणांना कोरोनाची लागण झाली.

त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख ३४ हजार ४३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १ लाख ४७ हजार ८५८ रुग्ण दगावले.

सध्या राज्यात २ हजार ५६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा कोरोनामुक्ती दर ९८ पूर्णांक ९ शतांश टक्के झाला आहे.

देशात कोविडचे २ हजार १५८ रुग्ण बरे

देशात काल कोविड १९ चे २ हजार ६८५ नवे रुग्ण आढळले तर २ हजार १५८ रुग्ण बरे झाले.

या कालावधीत देशात ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १६ हजार ३०८ आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के आहे.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 193.13 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 193.13 (1,93,13,41,918) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,44,45,929 सत्रातून हे

लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.36 (3,36,37,974) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा

देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

One Comment on “कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *