साखर कारखाने अडचणीत आणणाऱ्या संचालकांबाबत कडक निर्णय घेण्याची आवश्यकता

A strict decision needs to be taken regarding directors who cause trouble to sugar mills – Sharad Pawar

साखर कारखाने अडचणीत आणणाऱ्या संचालकांबाबत कडक निर्णय घेण्याची आवश्यकता- शरद पवार

सांगली:  बंद होत असलेल्या साखर कारखान्यांचा एक मोठा प्रश्न भेडसावत असतांनाच अमर्याद कामगार भरती करून साखर कारखाने अडचणीत आणणाऱ्या संचालकांबाबत कडक निर्णयाची आवश्यकता असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.Image of Sugar Factory Hadapsar News साखर कारखाना  हडपसर मराठी बातम्या

सांगली जिल्ह्यात  इस्लामपूर इथं आयोजित राज्यस्तरीय साखर कामगार मेळाव्यात ते काल बोलत होते. अवाजवी कामगार भरती करणाऱ्या कारखाना संचालकांकडूनच कामगारांचा पगार वसूल करण्यासह अशा संचालकांना यापुढे  निवडणुक लढवण्यास प्रतिबंध करणारा कायदा करावा लागेल असा इशारा शरद पवार यांनी यावेळी बोलतांना दिला.

या पार्श्वभूमीवर, सहकार तसंच कामगार मंत्र्यांसह साखर आणि कामगार आयुक्त, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची एक बैठक तातडीनं  घेतली जाईल असं ते म्हणाले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *