प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी

Successful implementation of Pradhan Mantri Awas Yojana and state sponsored Gharkul Yojana

प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी

गरिबांच्या घराची स्वप्नपूर्ती

ठाणे : ही नाती घरात एकोप्याने नांदण्यासाठी स्वतःचे हक्काचे घर असायला हवे. असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि ‘राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना’ केंद्र आणि राज्य शासनामार्फत ग्रामीण विकास यंत्रणा या विभागामार्फत ग्रामीण भागात राबविल्या जातात.प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी Successful implementation of Pradhan Mantri Awas Yojana and state sponsored Gharkul Yojana हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणपणे  १० हजार घरं प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनेमधून बांधण्यात आल्याने ह्या दोन्ही योजनांची यशस्वी अंमलबजावणी होताना दिसत आहे.

परिणामी वस्त्या, तांड्या-पाड्यांवरची मातीची, कुडाच्या झोपड्यांचे रूपांतर आता सिमेंटी पक्क्या घरात होऊ लागले आहे. त्यामुळे ऊन वाऱ्यापासून बचाव आणि पावसाळ्यात विंचू सापाच्या दंशाची शक्यता कमी झाली आहे. असं सुरक्षित हक्काचं छप्पर शासनाच्या आवास योजनेतून मिळत असल्याने माणसाची निवारा ही मूलभूत गरज पूर्ण होत आहे. असा प्रकारे सर्वासाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणाचा हेतू साध्य होत आहे.

ग्रामीण भागासाठी  अनेक वर्षांपासून आवास योजना सुरू आहे. टप्याटप्याने या योजनांमध्ये सकारात्मक बदल होत गेले. सामाजिक वंचित घटक आणि आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाचा सर्व्हे करून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

चार टप्प्यात १ लाख २० हजाराची रक्कम घराच्या बांधणीसाठी अनुदान स्वरुपात दिली जातो. शिवाय शौचालय उभारणीसाठी प्रोत्साहनपर १२ हजार रुपयांचे अनुदान  व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मजुरीच्या रूपाने साधारण रुपये वीस हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो. ही योजना जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या पाच तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागात राबवली जात आहे.

या केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी  महाराष्ट्र  शासनाच्या माध्यमातून  २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात आले.

या अभियानाची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागात यशस्वी अंमलबजावणी केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ या पुरस्कार गटात जिल्हा परिषदेला ‘तिसरा’ तर ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या पुरस्कार गटात ‘भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला.

विशेष म्हणजे या अभियान काळात पहिल्या टप्प्यात ३९ भूमिहीन कुटुंबाला हक्काची जागाही उपलब्ध करून देण्यात आली. तर  दुसऱ्या टप्प्यात १५ भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा चालू आहे.

या अभियान काळात डेमो हाऊस, घरकुल मार्टची उभारणी तसेच लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करून अभियानाबाबत जागृतीही करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक घराच्या भिंतीवर वारली चित्र रेखाटण्यात आली.  तर काही गावांमधील घरांच्या भींती एकसारख्या रंगाने रंगविण्यात आल्या.

सातत्याने क्षेत्रभेटी करून कामांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनांमुळे आमच्या कुटूंबाना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *