अन्न व्यावसायिकांनी जुन्या अन्न परवान्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Food traders are urged to submit applications for revision of old food licenses

अन्न व्यावसायिकांनी जुन्या अन्न परवान्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे : अन्न पदार्थांचे उत्पादक, रिपॅकर अथवा रिलेबलर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या अन्न परवान्यामध्ये आवश्यक बदल करण्यासाठी अन्न सुरक्षा पूर्तता प्रणालीमध्ये (एफओएससीओएस) ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.

अन्न व्यावसायिकांनी सध्याच्या अन्न परवाना क्रमांकामध्ये बदलता न करता ‘एफओएससीओएस’ प्रणालीत उपलब्ध मानक उत्पादनांची यादी (स्टॅण्डर्ड प्रॉडक्ट लिस्ट) प्रमाणे आवश्यक बदल करुन प्रणालीमध्ये ऑनलाईन सुधारणा अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

यासंदर्भात अन्न सुरक्षा पूर्तता प्रणालीद्वारे अन्न व्यावसायिकांना १ नोव्हेंबर २०२० पासून वेळोवेळी ई-मेल द्वारे सूचना, संदेश पाठविण्यात आलेले आहेत. तरी अद्यापही पुणे विभागातील ३ हजार ९०९ अन्न व्यावसायिकांनी त्यांच्याकडील जुना अन्न परवाना सुधारित करण्यासाठी अर्ज सादर केलेले नाहीत.

अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे सुधारित अर्ज सादर करण्याची कार्यवाही न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांच्या अन्न परवान्यांचे नूतनीकरण करता येणार नाही. याची नोंद घेऊन अन्न व्यावसायिकांनी तात्काळ कार्यवाही करावी, असेही श्री. देसाई यांनी कळवले आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *