राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 142व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा

Passing out Parade of 142nd NDA Course

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 142व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा

पुणे :  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी देशातील प्रमुख संयुक्त सेना प्रशिक्षण संस्था आहे जिथे  लष्करी नेतृत्वाचा पाया घातला जातो.  प्रबोधिनीत 2019 मध्ये रुजू झालेल्या 142 व्या तुकडीने तीन वर्षांचे  खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आणि एका औपचारिक समारंभात आज हे प्रशिक्षणार्थी  उत्तीर्ण झाले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 142व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा Passing out Parade of 142nd NDA Course हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

30 मे 2022 रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या  खेत्रपाल परेड ग्राउंडवर  142 व्या तुकडीचे  दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले होते. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, PVSM, AVSM, VM, ADC, हवाई दल प्रमुख (CAS) यांनी संचलनाचे निरीक्षण केले.

या संचलनात एकूण 907 छात्रांनी भाग घेतला त्यापैकी 317 छात्र अंतिम वर्षाचे   होते. त्यामध्ये 212 लष्कराचे छात्र , 36 नौदलाचे , 69 हवाई दलाचे आणि 19 छात्र  (भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि सुदान) या मित्र राष्ट्रांमधले होते. त्यानंतर हे छात्र  त्यांच्या संबंधित प्री-कमिशनिंग प्रशिक्षण अकादमीमध्ये  सामील होतील.

अकादमी कॅडेट Adjutantअभिमन्यू सिंग यांनी  एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम आल्याबद्दल राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. बटालियन कॅडेट Adjutant अरविंद चौहान यांनी एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत द्वितीय  स्थानासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले. स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन नितीन शर्मा यांना एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत तृतीय स्थानी आल्याबद्दल  राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळाले. MIKE स्क्वॉड्रनने संचलनादरम्यान सादर करण्यात आलेला चॅम्पियन स्क्वॉड्रन म्हणून प्रतिष्ठित ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ मिळवला.

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी  142 व्या तुकडीचे  उत्तीर्ण  छात्र , पदक विजेते आणि चॅम्पियन स्क्वाड्रनचे अभिनंदन केले.भविष्यात त्यांना नेमकं काय करायचं आहे आणि एक लष्करी अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल त्यांनी छात्रांना मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञानातील प्रगती आणि आधुनिक युद्धनीती पाहता सतत शिकण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.  प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या छात्रांच्या  पालकांचे त्यांनी अभिनंदन केले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *