अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात

Commencement of construction of Garbha Griha of Ram Mandir in Ayodhya

अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात

अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गर्भगृहाचा शिलान्यास करण्यात आला. संपूर्ण देशभरातले साधू संत या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि शिला पूजनाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.

गर्भगृहाचा पहिला कोरीव दगड योगी आदित्यनाथ यांनी सकाळी ११.१५ वाजता अभिजीत मुहूर्तावर ठेवला होता. या बांधकामाच्या शिलापूजनानंतर भव्य राम मंदिराचे स्वरूप येऊ लागेल.

या संपूर्ण मंदीराची उभारणी राजस्थान इथल्या मकराना मार्बलनं केली जाणार असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं दिली. दरम्यान अयोध्येतल्या सर्व मंदिरांना फुलांनी सजवलं आहे. तसंच संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

गर्भगृहाच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या दगडांचे कोरीव काम दोन कार्यशाळांमध्ये सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या ‘भूमिपूजन’ किंवा पायाभरणी समारंभाला उपस्थित होते, त्यानंतर बांधकाम सुरू झाले होते.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *