विधानपरिषदेच्या १० जागांसाठी अधिसूचना जाहीर

Notification for 10 seats of Legislative Council announced, Deadline for submission of applications till 9th

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी अधिसूचना जाहीर, ९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची मुदत

मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. या द्विवार्षिक निवडणूकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे.Vidhan Parishad Mumbai हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News Hadapsar Latest News

त्यानुसार, विधानसभेच्या सदस्यांकडून होणाऱ्या या निवडीसाठी येत्या ९ तारखेपर्यंत विधानमंडळ सचिवालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. १० जूनला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १३ जूनपर्यंत आहे. निवडणूक लढवली गेली तर २० जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

सदाभाऊ खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड आणि दिवाकर रावते यांचा कार्यकाळ संपत असल्यानं तसंच रामनिवास सत्यनारायण सिंग यांचं निधन झाल्यानं या दहा रिक्त जागांसाठी विधानसभा सदस्यांकडून दहा सदस्यांची निवड केली जाणार आहे

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *