शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्य मूल्यमापनासाठी समिती

Committee for evaluation of work of teachers during academic period

शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्य मूल्यमापनासाठी समिती

मुंबई  : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांचे संचालक डॉ. अभय वाघ या समितीचे अध्यक्ष आहेत.

समितीचे सदस्य सचिव म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, पुण्याचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल आहेत. समितीत अन्य 6 सदस्य आहेत.

समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे:

(१) समिती शिक्षकाच्या वार्षिक कार्यमूल्यमापनाबाबत विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यासारख्या शिखर संस्थांच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या अधिसूचनांचा अभ्यास करून मार्गदर्शक सूचना तयार करेल.

(२) शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यमूल्यमापनाकरिता कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबत शिफारशी करेल.

(३) नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची भूमिका व कार्याचा आढावा घेऊन हा कक्ष अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवेल.

(४) यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शासनास शिफारस करेल.

(५) डॉ. माशेलकर समितीच्या अहवालातील मुद्यांशी संबंधित शिफारशींचाही समिती विचार करून मार्गदर्शक सूचना निश्चित करेल.

समितीने आपला अहवाल शासनास तीन महिन्यांत सादर करावयाचा आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *