राज्यात काल कोविड-१९ च्या १ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद

1 thousand 357 new patients of Covid-19 were registered in the state yesterday

राज्यात काल कोविड-१९ च्या १ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात काल कोविड-१९ च्या १ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली, ५९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला.

सध्या राज्यात ५ हजार ८८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४Maharashtra Corona Virus Update हडपसर मराठी बातम्या Hadapsar News हजार २९४ रुग्ण मुंबईत आहेत, त्याखालोखाल ठाण्यात ७६९, पुण्यात ४४७, तर रायगड जिल्ह्यात १३५ रुग्ण आहेत. नंदुरबार, धुळे, जालना, बुलडाणा आणि गोंदिया या जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही.

राज्यात 1,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली तेव्हा हा सलग तिसरा दिवस होता.

मुंबईत काल कोरोनाचे ८८९ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ८४४ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ४५ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं.

काल ३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ३९६ दिवसांवर आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली की, त्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ते म्हणाले, ते होम आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि उपचार घेत आहे.

त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांच्या कोविड चाचण्या करून घेण्यास सांगितले आहे.

देशात काल दिवसभरात कोरोनाच्या ४ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद झाली तर २ हजार ६१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या देशात २४ हजार ५२ रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *