शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर-उपमुख्यमंत्री अजित पवार

Emphasis on education, health and road development – Deputy Chief Minister Ajit Pawar

शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर-उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्ह्यातील ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता

२६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यास मान्यता

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

Deputy CM Ajit Pawar
File Photo

श्री.पवार म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २६ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यात आवश्यक तेथे अंगणवाडी बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यात येत आहेत. रस्ते विकासालाही गती देण्यात येणार आहे.

अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी तरतूद करण्यात आले असून पुरवणी मागण्यातही अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परिसर विकास करताना मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्व कामे मंदिर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने त्यांनी यासाठी सहकार्य करावे.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असे श्री.पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी गतवर्षी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत झालेला खर्च, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची आणि अष्टविनायक परिसर विकास आराखड्याची माहिती दिली.२०२१-२१ या वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत १०० टक्के , अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९९.६९ आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ९९.९२ टक्के खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *