As there are 7 candidates in the fray for 6 Rajya Sabha seats in the state, the political movement is gaining momentum
राज्यसभेतल्या ६ जागंसाठी राज्यात ७ उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग
मुंबई : राज्यसभेतल्या सहा जागांसाठी राज्यात सात उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातल्या २८८ आमदारांपैकी ५५ आमदार शिवसेनेचे, ५३ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ४४ आमदार काँग्रेसचे आहेत.
विरोधी पक्ष भाजपकडे १०६ आमदार आहेत. या प्रमुख पक्षांखेरीज बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत.
यासोबतच मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष, पीडब्ल्यूपी, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी, जनसुराज्य पार्टी आणि क्रांतीकारी शेतकरी पार्टी यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत. या आमदारांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे.
आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचे तिसरे उमेदवार निवडून येतील-रामदास आठवले
आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक नक्कीच निवडून येतील, असा विश्वास केद्रीय सामाजिकन्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बातमिदारांना सांगितलं.
महाडिक यांच्या विजयासाठी मतांची जुळवाजुळव सुरू आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकरवर नाराज असलेले पाच आमदार देखील महाडिक यांनाच मतदान करतील, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेची काही मतं फुटण्याची शक्यता असल्यामुळेच सर्व आमदारांना हॉटेलात ठेवलं असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आरपीआयला जागा मिळायला हव्यात त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणी सुरू असल्याचं ते म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल-जयंत पाटील
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे, तसंच समाजवादी पक्ष हा उत्तरप्रदेशमध्ये भाजपविरोधी राहिलेला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
हडपसर न्युज ब्युरो
One Comment on “राज्यसभेतल्या ६ जागंसाठी राज्यात ७ उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग”