रिजर्व बँकेच्या पतधोरण आढावा समितीकडून रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास RBI Governor Shri Shaktikanta Das हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

RBI hikes Repo Rate by 50 basis points

रिजर्व बँकेच्या पतधोरण आढावा समितीकडून रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ

आता क्रेडिट कार्डवरुन देखील करता येणार युपीआय पेमेंट, रुपे कार्डपासून होणार सुरवात

ई-मॅनडेट व्यवहारांची मर्यादा 15,000 रुपयांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेने आज 2022-23 या आर्थिक वर्षातील आपला दुसरा पतधोरण आढावा आज जारी केला. सहा ते आठ जून 2022 या काळात, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली, पतधोरण आढावा समिती-एमपीसीची बैठक झाली. या बैठकीत, रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ करत तो 4.90 % करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने सलग दुसऱ्यांदा रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास  RBI Governor Shri Shaktikanta Das हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

त्यानुसार, स्थायी ठेव सुविधा दर देखील आता  4.65% इतके झाले आहेत तर सीमान्त स्थायी  सुविधा दर आणि बँक दर  5.15% एवढे असतील.

पुढे वाटचाल करतांना एकीकडे विकासाला पाठबळ देत, महागाई दर निश्चित लक्ष्याच्या आत ठेवण्याच्या दृष्टीने, एमपीसीने हस्तक्षेप कमी करण्यावर (withdrawal of accommodation)वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के तर महागाई दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील असा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे. प्रामुख्यानं अन्नधान्याचे दर वाढल्यानं चलनवाढीचा दर वाढेल असं रिझर्व्ह बँकेला वाटतंय.

गृहनिर्माण क्षेत्राला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज विविध उपाययोजनाही जाहीर केल्या. सहकारी बँका आता घराच्या पूर्ण किंमतीच्या इतकं कर्ज खरेदीदाराला देऊ शकतील. त्यामुळं शहरी भागात १ कोटी ४० लाखापर्यंत आणि ग्रामीण भागात ६० लाखापर्यंतची गृहकर्ज या बँका देऊ शकतील. तसंच ग्रामीण सहकारी बँकांही आता गृहनिर्मिती प्रकल्पांसाठी विकासकांना कर्ज पुरवठा करू शकतील.

शहरी भागातल्या सहकारी बँकांना घरपोच बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. यामुळं विशेषकरुन ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची सोय होणार आहे.

वीमा हप्ते, शिक्षण फी, म्युच्युअल फंडाच्या SIP यासारख्या गोष्टींचे नियमित हप्ते भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं खात्यातून आपोआप पैसे वळवून घेणारी ई-मँडेट सुविधा सुरू केली होती. आतापर्यंत यात प्रति व्यवहार ५ हजार रुपयांची मर्यादा होती. आता ही मर्यादा वाढवून १५ हजार रुपये करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात UPI द्वारे पेमेंट करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आतापर्यंत नागरिकांची बँक खाती, डेबिट कार्डच्या माध्यमातून UPI चे व्यवहार होत होते. आता क्रेडीट कार्डलाही ही सुविधा मिळेल. सध्या रुपे क्रेडिट कार्डधारकांना UPI च्या माध्यमातून व्यवहार करता येतील.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *