‘बार्टी’ मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Training of 300 students for UPSC prep through ‘Barti’

‘बार्टी’ मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार निर्णय

पुणे : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील २०० विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामध्ये १०० ने वाढ करुन आता २०२२-२३ या वर्षापासून ३०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

बार्टीमार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.

दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा २ हजार रुपये दिले जाते.

याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य ३ हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता ५ हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रक्कम रुपये ५ हजार प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षात टाळेबंदीच्या काळातदेखील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. बार्टीचे २०२० साली ९ तर २०२१ साली ७ उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या https://barti.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *