नेटवर्क प्लानिंग गटाची 20 वी बैठक संपन्न

दळणवळण क्षमता आणि पंतप्रधान गतीशक्ती योजना PM Gati Shakti - National Master Plan for Multi-modal Connectivity National Portal of India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

20th Meeting of The Network Planning Group (NPG)

नेटवर्क प्लानिंग गटाची 20 वी बैठक संपन्न

बहुआयामी पायाभूत सुविधांच्या दिशेने पावले टाकत, रेल्वे मंत्रालय लवकरच 100 कार्गो टर्मिनल्स तयार करणार

नवी दिल्‍ली : संपर्कजाळे योजना गटाची (एनपीजी) 20 वी बैठक 8 जून 2022 रोजी नवी दिल्लीत उद्योग भवन इथे झाली. डिपीआयआयटीच्या दळणवळण विभागाचे विशेष सचिव अमृतलाल मीना यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. एमओआरटीएच, एमओसीए, एमओआर, एमओपीएसडब्लू, एमओपी, डीओटी आणि नीती आयोग यासह विविध मंत्रालये/ विभागाच्या  सदस्यांनी बैठकीत भाग घेतला.दळणवळण क्षमता आणि पंतप्रधान गतीशक्ती योजना  PM Gati Shakti - National Master Plan for Multi-modal Connectivity National Portal of India हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News Hadapsar Latest News

दळणवळण क्षमता आणि पंतप्रधान गतीशक्ती योजने संदर्भातील विविध मुद्यांवर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योवेळी सांगोपांग चर्चा केली.

दूरसंचार विभागाने नुकतेच गतिशक्ती संचार पोर्टल सुरु केले आहे. त्याचे कौतुक करत, सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पोर्टलमध्ये एकत्रित केले आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. पोर्टलला राष्ट्रीय बृहद् आराखड्यात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी दूरसंचार विभाग लवकरच सर्व एनपीजी सदस्यांसोबत एक बैठक आयोजित करणार आहे.

बहुआयामी पायाभूत सुविधांच्या दिशेने पावले टाकत, रेल्वे मंत्रालय लवकरच 100 कार्गो टर्मिनल्स तयार करणार आहे. रस्ते आणि बंदरांशी त्यांचा सुलभ संपर्क (कनेक्टिव्हिटी) असेल.  मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सामायिक केले की विविध तपशील, नोंद, वेळापत्रक आणि आराखड्याचे काम आधीच सुरू आहे आणि लवकरच सखोल समन्वयासाठी इतर सर्व सदस्य मंत्रालये/विभागांसह ते सामायिक केले जाईल.

आंतर-मंत्रालयीन नियोजन आणि समन्वय एकीकृत करण्यासाठी राष्ट्रीय बृहद आराखडा पोर्टलची भूमिका विशेष सचिवांनी अधोरेखित केली. BISAG-N सह नियतकालिक संलग्नता आणि पोर्टलमध्ये नियमित प्रकल्प अद्यतने ठेवण्याची विनंती एनपीजी सदस्यांना करण्यात आली.  पोर्टलद्वारे नियोजन आणि प्रकल्प मॅपिंग नियमित करण्याचा सल्लाही सदस्यांना देण्यात आला.

वित्त मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांबाबत एनपीजी सदस्यांना अवगत करण्यात आले. यात संपर्कजाळे योजना गटाने दळणवळण आणि संपर्क व्यवस्था प्रकल्पांचे परिक्षण करणे अनिवार्य केले आहे.

नेटवर्क प्लानिंग गट, सर्व 8 पायाभूत सुविधा मंत्रालये/विभाग एकात्मिक नियोजन, एकाचवेळी अंमलबजावणी आणि एकत्रित निर्णय घेत आहेत.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *