The reservation of 216 Municipalities and Nagar Panchayats in the state will be released on Monday
राज्यातल्या २१६ नगरपालिका आणि नगर पंचायतींची आरक्षण सोडत सोमवारी होणार
मुंबई : राज्यातल्या एकूण 216 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या सोमवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
तसंच 15 ते 21 जून या कालावधीत त्याबाबतच्या हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगानं मुंबईत केली.
राज्यातल्या २०८ नगर परिषदा आणि ८ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्य पदासाठी ही सोडत काढली जाईल.
याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी आज प्रसिद्ध करणार असून १३ जून रोजी संबंधित ठिकाणी सोडत काढली जाईल. आरक्षणाची अंतिम अधिसूचना येत्या 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
हडपसर न्युज ब्युरो